शेवटी माणूस हा शब्दांचा भुकेला...

        वर्षभरात आपल्यासोबत खूप साऱ्या चांगल्या-वाईट घटना घडत असतात.जगाला मात्र त्यातल्या बऱ्याचश्या गोष्टिंचा कानोसा ही लागत नाही.बहुतेक तर आपल्या स्वतः पुरत्याच मर्यादीत राहतात.ह्या सर्व गोष्टी होत असताना काही मोजकीच माणसे आपल्या सोबत जोडलेली असतात.प्रत्यक्ष भेट नसली तरी अप्रत्यक्षरित्या ते नेहमीच आपल्या बद्दल आपुलकी व्यक्त करत असतात.आपल्या आयुष्यात होणाऱ्या खूप साऱ्या घटनांची त्यांना कसल्याही प्रकारची खबर नसते.अशा वेळी त्यांचे आपुलकीचे दोन शब्द आपल्या जगण्याला वेगळं बळ देतात.खरं तर एवढंच का, "कधीतरीच प्रत्यक्ष होणाऱ्या सहवासापेक्षा रोज होणाऱ्या अप्रत्यक्ष सहवासाचे सामर्थ्य नेहमी मोठं असतं".
                       *शेवटी माणूस हा शब्दांचा भुकेला*.
           

                                                     _____Sudesh34

Comments