बालपण...

*बालपण*...

पुन्हा लहान होण्याच्या तमाम इच्छा आज प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत.का?कशासाठी?
   
 ह्या बहुरूपी जगाच्या देखाव्यापासून ते लांब होते म्हणून का खोटे मुखवटे घातलेले सर्व चेहरे खरे वाटायचे म्हणून.

समोर दिसणारे चेहरे आपले का परके ह्याची चिंता नव्हती म्हणून का आज खरे चेहरे शोधताना त्रास होतो म्हणून.

आपल्याला कवेत घेऊन उद्याची सोनेरी स्वप्न पाहणारी माणसे सदैव आपल्या बाजूला होती म्हणून का आज आपलं दुःख ज्याच्या खांद्यावर डोकं टेकवून मांडावं अस कोणी नाही आहे म्हणून.

उद्याची भीति कधीच नव्हती म्हणून का आजच्या जगण्याचा विट आला म्हणून.
ह्या मतलबी जगापासून ते लांब होते म्हणून का आज आपल्याला जगासोबतच मतलबच नाही उरला म्हणून.

तिथे प्रेम करणारं शोधावं लागत नव्हतं म्हणून का आज प्रेम करणार कोणी उरले नाही अस वाटत आहे म्हणून.
काल कवेत घेऊन फिरणारे खूप होते म्हणून का आज मिठित घेणारं हक्काच कोणी नाही म्हणून.

तिथे कोणत्या भावनांचा खेळ नव्हता म्हणून का आजच्या खोट्या वाटणाऱ्या प्रेमाच्या चौकटीच्या बाहेर होते म्हणून.
कालच्या हजार बंधनांपासून ते दूर होतं म्हणून का आज प्रत्येक गोष्ट बंधनच वाटते आहे म्हणून.

काल काही जिंकण्याची भावना नव्हती म्हणून का आज काही हारत चाललोय अस वाटत म्हणून.

तेव्हा सुख आणि दुःख काय हे समजण्या पालिकडचं होतं म्हणून का आज सुख कशात आहे हे कळत नाही आहे म्हणून.
तेव्हा कोणती स्वप्नेच नव्हती म्हणून का आज ठरवलेल्या ध्येयाकडे योग्य वाटचाल होत नाही म्हणून.

का रोजच्या वाढणाऱ्या अपेक्षांनी थोड़ थोड़ मरत चाललोय म्हणून.
            ज्याची त्याची लहान होण्याची हजार कारणे.कारणे हजार असली तरीही लहानपणी लवकर मोठ होण्याची इच्छा बालगुण बसणारे पण आपणच.मग पुन्हा लहान होण्याचा हा अट्टहास कशासाठी?
             खरं तर आयुष्याला ना कोणता *Backward* आणि ना कोणता *Forward* ऑप्शन आहे.आयुष्य हे *current Situation* मधे *Backward* आणि *Forward* चे *Role play* करून जगायचं असतं.पुन्हा लहान होणे शक्य नाही पण मोठेपनी लहान होऊन जगणे सुद्धा कठीण नाही.दुःख आणि सुख कधीच *Postponed* करता येणार नाहीत आणि नाही ते आपण *Delete* करू शकत.ते येतच राहणार ह्या जगण्याच्या झोतासोबत.फक्त या जन्माला आनंद मानून जगा.कारण सगळे सार या जन्मातच आहे.पुनर जन्म होणार का नाही हे माहिती नाही.पण ह्याच  जन्मात पुन्हा लहान होऊन जगता आल तर नक्की जगा.☺☺
                                              ___तुमचाच
                                                   ...Sudesh34

Comments

Post a Comment